लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी लातूरच्या वतीने लातूर जिल्ह्यातील 6 विधानसभेच्या अनुषंगाने पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यासाठी येणार असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्यांना लातूर जिल्ह्यातील विधानसभा लढवायची आहे अशांनी दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी ठीक 11 वा. ग्रँड हॉटेल बार्शी रोड,लातूर येथे आपल्या परिचय पत्रासह मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आव्हान वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद यांच्या वतीने प्रसिद्धी माध्यमाला कळवले आहे.

