मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क-भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेची उद्या बुधवारपासून नागपूर दीक्षाभूमी ते दादर चैत्यभूमी अशी सामाजिक न्याय यात्रा निघत आहे . या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या यात्रेदरम्यान मेळावे,तसेच कार्यकर्ता संवाद सभा घेण्यात येणार असून भारतीय संविधान आणि महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर या यात्रेत खुली चर्चा करण्यात येणार आहे .
भीम आर्मी संस्थापक व आजाद समाज पार्टी (कांशीराम )चे अध्यक्ष ऍड चंद्रशेखर आजाद यांनी आगामी विधानसभेच्या पार्श्व भूमीवर महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रित करण्याचे ठरविले आहे . याचाच एक भाग म्हणून भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग हे उद्यापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत . सिंग यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात दिनांक ९ऑक्टोबर ते १२ऑक्टोबर २०२४अशी सामाजिक न्याय यात्रा काढण्यात येणार आहे. ९ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता दीक्षाभूमी नागपूर येथून या यात्रेचा प्रारंभ होत असून दुपारी नागपूर येथील कामठी रोड येथील बॅरिस्टर राजभाऊ खोब्रागडे सभागृह येथे दुपारी १ वाजता सामाजिक न्याय सभेचे आयोजन करण्यात आले आहे सादर सभेनंतर १० ऑकटोबर रोजी सकाळी ११ वाजता बुलढाणा येथी मलकापूर रॉड येथील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी सभागृहात कार्यकर्ता संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे . सदर सभेनंतर लातूर शहरात मराठवाडास्तरीय सामाजिक नाय सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
लातूरनंतर सोलापूरमार्गे हि यात्रा पनवेल येथून मुंबईत प्रवेश करणार असून 12 ऑक्टोबर रोजी दादर चैत्यभूमी येथे येथे दुपारी या यात्रेचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिली आहे.
सदर यात्रेदरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी ईच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी तसेच चाचपणी देखील यावेळी करण्यात येणार असून कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन कांबळे यांनी केले आहे .

