वायगाव येथे समाजमंदिर बांधकाम भूमिपूजन संपन्न

0
91

तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती

भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर -महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नांतून ब्रम्हपूरी तालुक्यातील वायगाव या गावात आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत दलीत वस्तीमध्ये १५ लक्ष रू. निधीतुन समाजमंदिर मंजूर करण्यात आले आहे. या विकासकामाचे भूमिपूजन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

भुमीपुजन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, मालडोंगरी येथील काॅंग्रेस कार्यकर्ते गणेश घोरमोडे, ग्राम काॅंग्रेस अध्यक्ष होमराज लोनबले, सरपंच गुरुदेव तुपट, चंद्रभान चौधरी, मुखरू श्रीरामे, गणवीर गुरूजी यांसह ग्राम काॅंग्रेस कमेटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बौध्द समाज अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावातील ग्रामवासी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here