

मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क -मुंबई-११- भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने नागपूर दीक्षाभूमी ते दादर चैत्यभूमी अशा सामाजिक नाय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेचा समारोप उद्या शुक्रवारी दादरच्या चैत्यभूमी येथे दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे .
भीम आर्मीचे संस्थापक व आजाद समाज पार्टी कांशीरामचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड चंद्रशेखर आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑक्टोबर २०२४ रोजी नागपूरच्या दीक्षा भूमीवरून पहिल्या टप्प्यातील सामाजिक न्याय यात्रेला प्रारंभ करण्यात आला यावेळे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे महाराष्ट्र प्रभारी अनिल धेनवाल , सुनील गायकवाड,सुनील थोरात,सीताराम गंगावणे,रमेश बालेश, नागपूर जिल्हाध्यक्ष आस्तिक बागडे,प्रशांत बनसोड पूर्व विदर्भ निरीक्षक शंकर मुन आदी रामुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी नागपूर येथे सामाजिक नयाय यंत्र सभा घेण्यात आली हत्ती . सदर कार्यक्रमानंतर बुलढाणा येथे प्रचंड उत्साहात जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली संवाद सभेचे आयोजन करण्यात आले पश्चिम विभाग निरीक्षक रमाकांत तायडे , जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र खंडेराव यावेळी उपस्थित होते. लातूर येथेही यावेळी संवाद सभेचे आयोजन मराठवाडा निरीक्षक अक्षय धावरेआणि मराठवाडा विभाग प्रमुख विनोद कोल्हे,जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे यांच्या नेतृत्वात संपन्न झाली या सभेलाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. .
दरम्यान लातूरवरून हि यात्रा मार्गक्रमण उद्या शुक्रवारी मुंबईत येत आहे मुंबईतील वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दुपारी २ वाजता अभिवादन करून हि यात्रा दादर चैत्यभूमीकडे प्रस्थान करेल .दुपारी ४ वाजता चैत्यभूमीत डॉ बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन करून चैत्यभूमीवर सदर यंत्राचा समारोप होईल अशी माहिती मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांनी दिली सदर प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील गरुड यांनी केले आहे.
लातूर येथे भाई विनय रतन सिंह भीम आर्मीच्या सामाजिक न्याय यात्रेच्या मंचावर बोलत असताना महणाले की बहुजन समाजाच्या समस्याचे निराकरण हे केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने मिळणार आहे, लातूर हा सर्वात जास्त बहुजनावर अन्याय अत्याचार होणारा जिल्हा आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी भीम अर्मिचा झेंडा व दांडा मजबूत ठेवावा असे हे लातूर येथे सामाजिक न्याय यात्रेच्या निमित्ताने आले असताना बोलत होते.














