
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यीक विचारमंच, महाराष्ट्र या समूहाने आज तीन शतक यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
या विचारमंचात बुध्द,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारावर आधारित समूहात अनेक प्रकारचे नवनवीन राबविले जात असून यात नवोदित साहित्यिकांना लेखन करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. आज या समूहाने तीन शतक पूर्ण केल्याबद्दल अनेक साहित्यीक या समूहाचे आपल्या काव्यातून किंवा लेखातून समूहाचे गुणगौरव करीत आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यीक विचारमंचाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभत असून साहित्यिकांच्या लेखणीचे कौतुक आपल्या अभिप्रायातून व्यक्त करीत असतात. त्याचप्रमाणे समूह उपाध्यक्षा माला मेश्राम समूहात नियमित उपक्रम विषय आयोजित करून त्यांच्या लेखणीला प्रेरणा मिळावी यासाठी सतत समूहात लक्ष देत असतात.आणि यामुळेच या समूहाने कमी कालावधीत तीन शतक पूर्ण केले आहे.
सर्व मान्यवर साहित्यिकांचे आभार डॉ.विनोद जाधव समूह सल्लागार, अनिल सावंत समूह सचिव, नरेंद्र पवार समूह अध्यक्ष, माला मेश्राम समूह उपाध्यक्ष,प्रा नानाजी रामटेके समूह समीक्षक यांनी आभार मानले आहे.














