prabodhini news logo
Home चंद्रपूर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी तर्फे सतीश मालेकर यांना बल्लारपूर विधानसभा...

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी तर्फे सतीश मालेकर यांना बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची उमेदवारी जाहीर

0
141

बल्लारपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – ओबीसी चळवळीतील एक दमदार युवा नेतृत्व, मंडल यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजामध्ये जनजागृती करणारे, जनतेच्या सेवेसाठी पदवीधर शिक्षकीचा राजीनामा देणारे सर्वसामान्य कुटुंबातला युवा आश्वासक चेहरा म्हणून मालेकर गुरुजी कडे बघितले जाते. मराठा सेवा संघ तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष, शिवब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, शरीर सौष्टव स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील तिसरा क्रमांक पटकवणारे व बहुजन हिताय, बहुजन सुखाय कर्मचारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तथा संचालक पद भूषवणारे, शिक्षक असताना अनेक शिक्षकाचे प्रश्न लावून धरणारे ध्येयवेडे व्यक्तीमत्व, कासरा या मराठी चित्रपटात अभिनय करणारे असे बहुरंगी व्यक्तिमत्वाला आद. बाळासाहेब आंबेडकरांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मैदानात उतरविले आहे. विरोधकाला घाम फोडून यश प्राप्त करणाऱ्या सतीश मालेकर गुरुजी यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here