
मंगेश जनबंधु तालुका प्रतिनिधी भंडारा- भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील, चोरी, मारामारी, अवैध दारू विकी, अवैध जुगारव्यवसाय करणारे इत्यादी गुन्हेगारांवर भंडारा जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी त्यांचेकार्यक्षेत्रातील गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवुन, त्यांचेवर दाखल असलेल्या गुन्हयाचा अभिलेख तयार केला वत्याचा तड़ीपार प्रस्ताव पोलीस अधीक्षीक भंडारा नूरूल हसन यांचे मार्गदर्शनात तयार करून, त्यांचे मार्फतीने भंडारा जिल्हयातील उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालयात सादर केले असता, उपविभागीय दंडाधिकारी यांनी अशा सराईत गुन्हेगाराना कायद्याचे कसोटीत बसवुन त्यांचे गुन्हेगारीचा अस्त करण्याकरीता,तसेच भंडारा जिल्हयातील आगामी विधानसभा निवडणुका शांततेत होण्याकरीता उपविभागीय दंडाधिकारी भंडारा यांनी 16, उपविभागीय दंडाधिकारी तुमसर यांनी 09, व उपविभागीय दंडाधिकारी साकोली यांनी 02 असे एकुण 27 गुन्हेगारांना भंडारा जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल, मनोज सिडाम, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक (स्थागुशा) नितीनकुमार चिंचोळकर, व भंडारा जिल्हयातील ठाणेप्रभारी अधिकारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचेपोलीस हवालदार राजेश पंचबुधे, पोलीस नाईक अंकोश पुराम यांनी केली.

