prabodhini news logo
Home ठळक बातम्या घोटाळेबाज ईव्हीएम मशीनची उत्पत्ती काँग्रेस आणि भाजपची ?

घोटाळेबाज ईव्हीएम मशीनची उत्पत्ती काँग्रेस आणि भाजपची ?

0
170

ब्राम्हण वर्गाने शासक राहण्यासाठी एकत्रित केली खेळी ?

चक्रधर मेश्राम यांनी बिनधास्त निर्भिडपणे व्यक्त केले विचार

नागपूर प्रतिनिधी – दि.१८/१०/२०२४:- ईव्हीएम मशीन चा प्रस्ताव संसदेत ज्या माणसाने ठेवला त्या अभिषेक मनू संघवी (काँग्रेस), प्रस्ताव क्रमांक एकचा आहे 422/1984, या प्रस्तावावर पहिला अनुमोदन देणारा व्यक्ती अटल बिहारी वाजपेयी (भाजपा) आणि दुसरा अनुमोदन देणारा व्यक्ती हा प्रकाश खरात (सीपीआय) चार आहे.

काँग्रेस ,भाजपा सीपीआय या ब्राम्हणांच्या पार्टीच्या आहेत आणि हे भारतीय जनतेला गुलाम करून घेण्यासाठी पप्रयत्न करित आहेत. त्यासाठी समस्त बहुजन समाजाला जागृत राहून संविधानिक न्याय , हक्क आणि अधिकार समजून घेण्याची गरज आहे असे मत चक्रधर मेश्राम यांनी आमच्या प्रतीनिधींशी बोलतांना व्यक्त केले. या तिन्ही पार्ट्यानी ईव्हीएम मशीन भारतात आणुन बहुजनांना गुलाम करून घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. बहुजनांची मतं खाण्यासाठी, मतं हडपण्यासाठी, मतं चोरी करण्यासाठी काँग्रेस ने ईव्हीएम मशीन भारतात आणले असल्याचे परखड मतही चक्रधर मेश्राम यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत व्ही.पी.सिंह यांनी विरोध केला होता आणि राष्ट्रपती आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहून लिखित विरोध केला, पण काहीं केल्या व्ही.पी.सिंह यांचे ऐकण्यात आले नाही.
त्यानंतर 24 सप्टेंबर 1985 ला हा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झाला होता आणि लगेच 2 जानेवारी 1986 ला राष्ट्रपती ग्यानी झेल सिंग यांनी या प्रस्तावावर सही केली आणि हे ईव्हीएम मशीन वापरण्याचे बिल भारतात लागू झाले.
म्हणजे – हे बिल भारतात आणण्यासाठी ईव्हीएम मशीन भारतात आणण्यासाठी सगळ्यात जास्त हात आणि ज्यादा काम काँग्रेसने केले आहे. म्हणून आजही काँग्रेस चे लोकं, नेते, मंत्री ईव्हीएम मशीन च्या विरोधात शब्द काढताना दिसत नाहीत. त्यांच्या तोंडून एक शब्दही निघत नाही. त्यांचे तोंड कोणत्या दाबणीत टाकून जबरदस्त धाग्याने शिवले आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ईव्हीएम मशीन भारतात आणण्यासाठी सहमती दर्शवली ते यांचे पुर्वज होते का? असेही परखड प्रतिपादन चक्रधर मेश्राम यांनी व्यक्त केले आहे.
आज देशाचा सत्यानाश ज्या कारणामुळे झालेला आहे आणि होत आहे त्याचे संपूर्ण कारण बहुजनांना माहिती असले पाहिजे नाहीतर पुन्हा …फसत राहु आणि सतत विश्वासघात होत राहील . बहुजन समाजाला अंधारात ठेवून चिटिंग होत आहे. आमच्या वोटींगचा गैरवापर होऊ लागला आहे. फक्त निवडणुकित केवळ मत टाकण्यापुर्ता वापर होऊ द्यायचे नसेल तर ईव्हीएम मशीन च्या गडबडीची संपूर्ण माहिती लोकांकडे असली पाहिजे. ईव्हिएम मशीन बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनी कडे देण्यात आले त्या कंपनीचे नाव आहे (ECIL) इेलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि दुसरी कंपनी आहे (BEL) भारत इेलेक्ट्रॉनिक लिमिटेड.
यामध्ये जी भारत ईक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी आहे ती ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे, ही कंपनी फक्त भारतातच ब्लॅक लिस्टेड कंपनी नाही तर संपूर्ण जगात ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी ईव्हिएम मशीन 2003 मध्ये बनविले आहे. 2003 पूर्वी 1989 ला पायलट प्रोजेक्ट म्हणजे नमुना चाचणी राजीव गांधी च्या काळात या मशीन चा पायलट प्रोजेक्ट म्हणून उपयोग केला आणि नंतर 2003 मध्ये या दोन कंपन्यांनी ईव्हिएम मशीन काँग्रेस ला दिले. काँग्रेस 2004 मध्ये आणि 2009 मध्ये या मशीन चा उपयोग करून घोटाळा करून जिंकून आली.
काँग्रेस ची वेळ संपल्यानंतर भाजपा 2014 आणि 2019 मध्ये ईव्हिएम मशीन चा उपयोग करून घोटाळा करून जिंकून आले.
भाजपा जिंकून येण्यासाठी ज्या अडचणी होत्या त्या कायदा बनवून काँग्रेस ने दूर केल्या – 56 C, 56 D, 49MA हे कायदे ते आहेत ज्यामुळे भाजपा सुरक्षित घोटाळा करून जिंकून आली. हे बॅकग्राउंड आहे आणि हे बॅकग्राउंड सांगण्याच्या मागे कारण की, बऱ्याच लोकांना अगदी शिकलेल्या लोकांना सुद्धा ईव्हिएम मशीन चा जन्म कधी आणि कसा झाला हे माहिती नाही, घोटाळा कसा करता येतो हे माहिती नाही.

ईव्हिएम मशीन ची जन्मकुंडली बऱ्याच जणांना माहिती नाही ती माहिती करून देणे हा उद्देश आहे.
ईव्हिएम हटावो ! देश बचाओ! तरच देशातील समस्त बहुजन समाज गुलाम होण्यापासून वाचु शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here