
भद्रावती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक १८ व १९ ला दोन दिवसीय संतनगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव संत नगाजी महाराज मंदिर देवस्थान येथे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुरज शहा वीज अभियंता जयप्रकाश लोनगाडगे, मधुकर वाटेकर , शेखर घूमे, सुमित हस्तक, नगाजी निंबाळकर, बंडू लांडगे ,माया चिंचोलकर, रेखा अतकरे आदी मंचावर उपस्थित होते पुण्यतिथी महोत्सवत संबोधित करताना समाज सार्वजनिक कार्यक्रमात ज्या प्रकारे सहभागी होत असतो त्याचप्रमाणे आपल्या समाजात जन्म घेणाऱ्या संताच्या पुण्यतिथी महोत्सवात एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुरज शहा यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलेही मनोगत व्यक्त केले. रांगोळ , पाककला या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या महिलांचा तसेच १० व्ही १२ व्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शहरातून संतनगाजी महाराज यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रम आयोजीत करण्यासाठी नगाजी महाराज उत्सव समिती तसेच सलून दुकानदार संघटना यांचे मोलाचे सहकार्य लाभले.














