शिवसेना उपनेतेपदी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची नियुक्ती

0
162

जयेंद्र चव्हाण जिल्हा प्रतिनिधी भंडारा 9665175674 – भंडारा – शिवसेना (शिंदे गट)पक्षाच्या अतिशय महत्वाच्या उपनेते पदावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांची नियुक्ती शिवसेना पक्षनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

या नियुक्ती नंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून उत्साह वाढला आहे.
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा या 6 जिल्ह्याचे समन्वय करून पक्षाचे काम वाढविण्याची जबाबदारी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. युवासेना प्रमुख खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा आमदार नरेंद्र भोंडेकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्यामुळे पूर्व विदर्भातील सर्व जिल्हा प्रमुखांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला असून आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष जोमाने वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here