सुभाष दरेकर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर – श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील तरुणांनी वाढदिवसा खर्च टाळून शाळेतील विद्यार्थ्यांना केली मदत आज आपल्या स्वतः:घ्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन हिरडगाव गावातील ५ वर्गमित्रांनी अनुक्रमे १) मा.संदीप चंद्रकांत बनकर २) मा.आप्पासाहेब गिताराम दरेकर ३) मा. वसंत नाना दरेकर ४) मा.सचिन बापूराव बेद्रे व ५) मा.नाना बबन दरेकर यांनी ₹२७३००/-(अक्षरी रुपये सत्तावीस हजार तीनशे मात्र) रुपये किंमतीचे १०० स्टेनलेस स्टील लेझीम, ५० झांज(विणकामासह) व १ तांबा-स्टील ताशा इ.साहित्य जि.प.प्राथ.शाळा हिरडगाव शाळेला सप्रेम भेट दिले. पाचही मित्रांनी सत्काराला विरोध करुनही त्यांना विनंती करुन शाळेत या पाचही मित्रांचा आज सन्मान करणेत आला… याप्रसंगी शाळेतील संगणक दुरुस्त करुन व दानशूर ग्रामस्थांकडून काही नवीन संगणक मिळवून शाळेत लवकरच संगणक लॅब सुरु करणेचा मनोदय या तरुण मित्रांनी बोलून दाखवला. त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा…!
शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व शाळेच्या वतीने या मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व दिलेल्या छान भेटवस्तुबद्दल आभार मानले.

