श्रीगोंदा तालुक्यातील सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभा लढु – घन:शाम शेलार

0
230

सुभाष दरेकर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर ९८५८३२२४६६ – श्रीगोंदा तालुक्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकासआघाडीने काल परवा पक्षात आलेल्या नागवडे यांना उमेदवारी दिली त्यामुळे आघाडीतील सर्वच नेत्यांच्या मनातील भावना अनावर झाल्या सर्व सामान्य जनतेमध्ये उमेदवारी विषय अनेक चर्चा रंगु लागल्या आहेत निष्ठेविषय शंका निर्माण झाल्या आहेत आज घनश्याम शेलार यांनी रत्नकमल मंगल कार्यालयात एल्गार मेळावा आयोजित केला होता हजारो कार्यकर्ते उपस्थित होते आज अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विधानसभेचा फाॅर्म भरण्यात आला.

कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यकर्त्यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या व कसल्याही परिस्थितीत आण्णा तुम्ही विधानसभेची निवडणूक लढाच अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी घन:शाम शेलार बोलताना म्हणाले गेल्या पाच वर्षात समाजातील लोकांच्या सुख दुःखात नेहमी मी राहीलो समाजातील लोकांची लहान मोठ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले तालुक्यातील रस्ते कुकडीचे पाणी असे अनेक प्रश्न कायम आहेत ज्यांना तिकीट मिळाले त्यांनी स्वतः जिल्हा परिषद सदस्य असताना गटात काय काय विकास केला ते स्वतः च्या मनाला विचार करून पहा जिल्हा बॅकेच्या निवडणूकीत आपली भूमिका तपासून पाहणे आवश्यक आहे तालुक्यातील अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी समविचारी नेत्यांनी एकत्र येऊन निवडणूक केली पाहिजे आघाडीतील साजन पाचपुते राहुल दादा जगताप यांना उमेदवारी मिळाली असती तरी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन काम केले असते पण ऐनवेळी सर्व पक्ष फिरून आलेल्यांना उमेदवारी दिली त्यामुळे आता निवडणुकीतुन माघारी घ्यायचं नाही सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रतापितांच्या विरोधात लढाई करून जिंकायची आहे ती सामान्य जनतेच्या आर्शिवादाने आमदार व्हायचे आहे ते दुसऱ्या उमेदवारांना मिरवायला प्रतिष्ठा वाढवायला मला आमदार व्हायचे ते फक्त तालुक्यातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे.
यावेळी अँड काकडे श्रीपाद ख्रिस्ती डॉ कोकाटे आनंदकर सर भरत भुजबळ रामभाऊ रायकर निशांत लोखंडे सुहास झेंडे केशव झेंडे व महीला पदाधिकारी असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here