prabodhini news logo
Home ईगतपुरी ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात स्थानिक विरुद्ध उपरे लढा होणार तीव्र ?

ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात स्थानिक विरुद्ध उपरे लढा होणार तीव्र ?

0
151

ईगतपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने विस्ताराने अवाढव्य, प्रवासासाठी जिकिरीचा अतिदुर्गम असणारा मतदारसंघ हा ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघ आहे.आकार व विस्ताराने एवढा मोठा असुनही या मतदारसंघात एकही स्थानिक सक्षम उमेदवार सर्वच प्रमुख राजकिय पक्षानां भेटु नये ? असा सवाल करत स्थानिक नेत्यानीं बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्धार केला आहे.यामुळे या मतदारसंघात स्थानिक विरुद्ध उपरे अशी लढाई रंगण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, माजी पंचायत समिती सभापती गोपाळा लहांगे, श्रीमती अनिता घारे आदीसह अनेक स्थानिक नेत्यांनी उमेदवारी नाकारल्याने स्वपक्षाविरुद्ध बंड करत स्थानिक उमेदवार या मुद्दयावर शड्डु ठोकला आहे.

झोले महायुतीकडे परतले
स्थानिक विरुद्ध उपरे या मुद्दयावरुन रान पेटवत मा.क.पा कडुन उमेदवारी करण्याचा दावा करणारे माजी आमदार शिवराम झोले यांचे पुत्र बाळासाहेब झोले यांनी तलवार म्यान करत महायुतीकडे परतले आहे.
त्यांच्या महायुतीकडे परतण्याने महायुतीचे उमेदवार हिरामन खोसकर यांची बाजु भक्कम झाल्याचा दावा प्रदेश चिटणीस रा.कॉ.चे गोरख बोडके यांनी केला आहे.

माजी आमदार सौ.गावितही रिंगणात ?
उ.बा.ठा.शिवसेना गटाच्या उपनेत्या तथा माजी आमदार सौ. निर्मला गावित यांनीही म.वि.आ.विरुद्ध बंड करत अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली आहे.
यामुळे म.वि.आ. व महायुती दोघापुढेही बंडखोरीचे आव्हान उभे ठाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here