
वणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज वणी -76 वणी विधानसभा मतदारसंघात भारतिय कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडिकडे दावा सादर करून वणी ही जागा भाकपसाठी सोडावी यासाठी आग्रह केला आणी आताही प्रयत्न सुरू आहेत.एका पक्षाने तर उमेदवारी पण टाकली आहे.तसेच भाकपनेही काल शेतकरी मंदीर येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करून आज कॉ.अनिल हेपट यांनी नामांकन अर्ज सादर केला.

काल झालेल्या सभेत प्रा.धनंजय आंबटकर यांचे अध्यक्षतेत प्रमुख मार्गदर्शक म्हणुन राष्ट्रीय कौंसिलर कॉ.तुकाराम भस्मे (अमरावती) उपस्थित होते.तर अतिथी म्हणुन आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. दिवाकर नागपुरे(यवतमाळ),भाकपचे जिल्हासहसचिव कॉ.संजय भालेराव, मारेगाव तालुका प्रभारी कॉ.बंडु गोलर,झरी तालुका प्रभारी कॉ.वासुदेव गोहणे,राळेगाव तालुका सचिव कॉ.प्रविण आडे,चंद्रपुर जिल्हा सचिव कॉ.प्रकाश रेड्डी,भद्रावती तालुका सचिव व जिल्हा सहसचिव कॉ.राजु गहीनावार,कॅप्टन अरविंदकुमार,वाहनचालक युनियन अध्यक्ष कॉ.शब्बीरखान पठाण,ईरफान भाई,गणेश कळसकर,कैलास आत्राम,जयवंत उलमाले उपस्थित होते.आघाडीमधील ईतर पक्षाचे लोकांनी सुद्धा शुभेच्छा देऊन सहकार्य करण्याचे सांगितले.उमेदवार कॉ.अनिल हेपट यांनी उमेदवारी भरण्यामागची भुमीका स्पष्ट केली. प्रस्तावना कॉ.अनिल घाटे यांनी केली.संचालन राकेश खामणकर यांनी तर आभार प्रदर्शन ऋषी उलमाले यांनी केली.














