
बल्लारपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – बल्लारपूरातील काही युवक कामानिमित्त मुल ला जाताना चिचपल्ली गावा जवळ अपघात झाला. त्यात 4 जण जखमी झाले असून यात एक गंभीर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज मुल येथे विधानसभा एका राजकीय पक्षाच्या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या रॅली मध्ये सहभाग होण्याकरिता जात असताना 11 वाजताच्या सुमारास चिचपल्ली जवळ वळणावर अपघात झाला. त्यात बल्लारपूर शहरातील गांधी वॉर्ड बल्लारपूर येथील 4 युवक जखमी झाले. त्यात स्वप्नील चिंचोळकर, अक्षय वांढरे, नंदू शेंडे व अमोल वासेकर चा समावेश आहे. चंद्रपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून स्वप्नील चिंचोळकर व अक्षय वांढरे यांना अतिदक्षता विभागामध्ये भरती केले. असल्याची माहिती आहे.














