माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली 120 कार्यकर्त्यांनी केला पक्ष प्रवेश..!!

0
101

धर्मराव बाबांचा राष्ट्रवादी काँग्रेसला सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा येथे मोठे खिंडार..!!

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – अहेरी – माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची दिवसेंदिवस जनसामान्यांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण होहून लोकप्रियता वाढतांना दिसत आहे, आगामी विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर दररोज मोठ्या प्रमाणावर अनेक पक्षातील कार्यकर्ते नाग विदर्भ आंदोलन समितीला समर्थन करीत राजेंचा युवा नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करीत आहेत.

सिरोंच्या तालुक्यातील रेगुंठा येथील मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पाडत 120 युवा कार्यकर्ते यांनी पुरुषोत्तम कडार्लावार तथा आकाश बचालकुरा यांच्या पुढाकाराने माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली अहेरी येथील रुक्मिणी महाल येथे काल पक्षप्रवेश केला. त्यावेळी राजे साहेबांनी त्यांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.!
“राजे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है”अशी घोषणा बाजी यावेळी करण्यात आली. अहेरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री धर्मराव बाबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सिरोंच्या तालुक्यात जबर धक्का बसला आहे असे मानल्या जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी नाग विदर्भ आंदोलन समिती तर्फे आपला नामांकन अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नुकतेच दाखल केले होते. त्यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने सर्वसामान्य जनता सहभागी होती.राजे लाखोंच्या मताने निवडणूक जिंकणार आणि अहेरी विधानसभा क्षेत्र विकासाच्या प्रगतीपथावर असणार, असे आज जनतेने ठरविल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here