विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व मान्य – निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला खिंडार
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर – ब्रम्हपुरी तालुक्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विकासाचा झंजावात व काँग्रेस पक्षाच्या विचार सरणीला प्रेरित होऊन तालुक्यांतील बरड किन्ही येथील अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत आज विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचे उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला खिंडार पडली आहे.
गेल्या १० वर्षापासून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी क्षेत्र विकासासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून कोट्यावधींचा विकास निधी खेचून आणला. तद्वतच संपुर्ण क्षेत्रांतील सर्व समाजाला समान न्याय, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, अनेक सामजिक कार्य यासह अत्यावश्यक मूलभूत गरजा पुर्ण करुन नागरिकांच्या अडचणी दूर केल्या.अशा विविध कार्यांना प्रेरित होऊन ब्रम्हपुरी तालुक्यांतील बरडकिन्ही येथील भाजपचे कट्टर समर्थक असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आज पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये महेंद्र राऊत, देवनाथ पाकडे, अमोल तोंडरे, सुरज नाकतोडे, कार्तिक नाकतोडे, रुपेश मैंद, सुधीर दोनाडकर, ,आदित्य शेंडे,भूपेश शेंडे, सुरज खोब्रागडे यांचा समावेश आहे.
आयोजित पक्ष प्रवेशाप्रसंगी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर, ब्रह्मपुरी काँग्रेस विधानसभा युवक अध्यक्ष सोनू नाकतोडे, पोपटे सर ब्रम्हपुरी विधानसभा सोशल मीडिया प्रमूख चोकेश्वर भरडकर व बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बरड किन्ही येथील भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश यामुळे भाजपला खिंडार पडली असुन भाजीपाला लागलेल्या गळतीचा आगामी निवडणुकांमध्ये परिणाम जाणवणार हे निश्चित मानले जात आहे.

