नाट्यश्री कविता स्पर्धेतील पंचेचाळीसाव्या सत्रात रोहिणी अमोल पराडकर विजयी

0
159

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे पंचेचाळीसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २९ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात कोल्हापूर येथील कवयित्री रोहिणी अमोल पराडकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “फराळाचे संमेलन” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
सौ. रोहिणी अमोल पराडकर हे कोल्हापूर येथील प्रसिद्ध कवयित्री व साहित्यिक आहेत. व्यवसायाने त्या लेडीज फोटोग्राफर असून अनेक सांस्कृतिक व साहित्यिक संस्थांचे सदस्य आहेत. त्यांचे “काव्यांजली, दत्त शब्दांजली, बालगीत, चिवचिवाट, काव्यसरीता, आणि मधुबन” इ. काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांना विविध स्पर्धांतून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध वृत्तपत्रांतून व मासिकातून त्यांचे साहित्य नियमितपणे प्रकाशित होत असतात.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या पंचेचाळीसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने ऊकंडराव नारायण राऊत, जयराम धोंगडे, प्रा. पंढरी बनसोडे, सौ. वंदना राजेंद्र सोरते, राजेंद्र यादवराव सोनटक्के, पुनाजी कोटरंगे, पी. डी. काटकर, कु.भावना रामटेके, रोहिणी पराडकर, संगीता ठलाल, सुभाष धाराशिवकर, मारोती आरेवार, तुळशीराम उंदीरवाडे, माधुरी अमृतकर, मुर्लीधर खोटेले, प्रिती ईश्वर चहांदे, वामनदादा गेडाम, रोशन येमुलवार, नरेंद्र गुंडेली, लता शेंद्रे, यामिनी मडावी, संतोष कपाले, पुरुषोत्तम दहिकर, शैला चिमड्यालवार, सुजाता अवचट,रेखा दिक्षित, वंदना मडावी, खुशाल म्हशाखेत्री, संगीता रामटेके इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here