
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
व्यापारी असोसिएशन सिंदेवाही -लोनवाहीच्या वतीने गॅरेज कामगारांना दिवाळी निमित्त भेट वस्तु देऊन दिव्या ट्रेडर्स चे परिसरात कार्यकारणी चे सर्व सभासदांचे हस्ते वितरित करण्यात आले.
शहरातील प्रत्येक कामगार महत्त्वाची भूमिका बजावतात. कार्तिक एकादशीचे निमित्याने औचित्य साधून बुधवार ला दुपारी 4. 00 वाजता दिवाळी भेट वस्तू देण्यात आले. बाजारपेठेतील व्यवसायाचे दृष्टीने दुकानातील मालाची चढ-उतार करीत असतात. गॅरेजने आलेल्या सामानाची दुकानापर्यंत व दुकानातून गॅरेज दुकानापर्यंत पोहचवत असतात. व्यवसायात वृद्धीसाठी कामगारांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता म्हणून व्यापारी असोसिएशनच्या कार्यकारणी चे हस्ते आनंदाची भेट कामगारांना नेहमी प्रमाणे दिवाळी भेटवस्तु वितरित केली जातात. यावेळी कार्यकारणी चे अध्यक्ष दिलीप दुस्सावार ,सचिव श्याम छत्रवाणी ,संदीप बांगडे, अनुप श्रीरामवार, गजेंद्र देवगिरकर, चेतन सूचक, बाबाजी भवानी, सुधीर कुडकेलवार , संदीप चेन्नुरवार, राजू नरडे, तसेच कामगार संघटनेचे सदस्य उपस्थित होते.














