
महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ सभेत प्रतिपादन
जिल्हा प्रतिनिधी जयेंद्र चव्हाण 9665175674 – भंडारा – राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहण्याचे काम केले आहे. या भागात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सिंचनाची साधने असल्याने शेतकरी धानासह इतर पिकांचे उत्पादन घेत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्यावतीने किसान सन्मान निधीचे १२ हजार रुपये ऐवजी आता १५ हजार रुपये देण्याचा आमचा वादा आहे अशी ग्वाही खा. प्रफुल पटेल यांनी दिली.
महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ लाखनी तालुक्यातील पोहरा येथील गोंडी मोहल्ला, आझाद चौक येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करतांना बोलत होते.ह्यावेळी महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे,राष्ट्रवादीचे नेते सुनील फुंडे, तु. रा. भुसारी गुरुजी, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, विनायक बुरडे, धन्नू व्यास, डॉ. शहारे, रामलालजी पाटणकर, नागेश पाटील वाघाये, उमरावजी आठवले, हेमकृष्ण वाडीभस्मे, सूर्यभान सिंगनजुडे, दादुभाऊ खोब्रागडे, श्रावण कापगते, त्रिवेणीताई पोहरकर, अर्चनाताई ढेंगे, दत्ताभाऊ हाटनागर, शारदाताई मते, ज्योतीताई सपाटे, रेवताताई पटले, अश्विनीताई फटे, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे खा. पटेल म्हणाले की, विकास कामे करतांना कार्यक्षम व खंबीर व्यक्तित्व असले पाहिजे. विधानसभा क्षेत्रात विकास कामं चांगली व्हावीत, विकासाची तळमळ आणि ती कामं पूर्णत्वास नेण्याची क्षमता असलेला प्रामाणिक माणूस अविनाश ब्राह्मणकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या भागाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करण्याचे आवाहन केले.यावेळी साकोली मतदारसंघातील मतदारांनी कायम विकास पुरुषाला साथ देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.














