prabodhini news logo
Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातही जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के…

गडचिरोली जिल्ह्यातही जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के…

0
167

नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने

गडचिरोली प्रतिनिधी तिरुमलेश कंबलवार : आज ४ डिसेंबर बुधवारी तेलंगणा राज्यातील मुलुगु जिल्ह्यातील असलेला मेडारम येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. मेडारम हे महाराष्ट्राच्या लगतच्या असल्याने सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यात अहेरी,आलापल्ली,सिरोंचा या भागात जाणवले आहे.

या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here