जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ‘मॉब स्ट्रीट प्ले’च्या माध्यमातून जनजागृती

0
82

लातूर जिल्हा परिषद व उमंगचा उपक्रम

लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. 4 दिव्यांगाप्रती जनजागृती व्हावी, या उद्देशाने लातूर शहरातील विविध चौक व गर्दीच्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली उमंग इन्स्टिटयूटच्या पथकाने फ्लॅश मॉब स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून जनजागृती केली.

दिव्यांगत्व, प्रतिबंध, लवकर ओळख आणि लवकर हस्तक्षेप याबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती बस स्थानक, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा गांधी चौक, गंजगोलाई, विवेकानंद चौक, एमआयटी कॉलेजसह अनेक ठिकाणी आयोजित पथनाट्याच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. उत्साही आणि माहिती पूर्ण कामगिरी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने जमले होते.

कार्यक्रमाचा अविभाज्य भाग असलेल्या ‘फ्लॅश मॉब पोस्टर प्रेझेंटेशनने’ दिव्यांगत्व रोखण्यासाठी लवकर ओळख आणि हस्तक्षेपाचे महत्त्व प्रभावीपणे सांगितले. पोस्टर्समध्ये दिव्यांग बांधवांसाठी सर्व समावेशकता, सुलभता आणि समान संधींची गरज अधोरेखीत करण्यात आली. फ्लॅश मॉब स्ट्रीट प्ले, पोस्टर प्रेझेंटेशन आणि इतर उपक्रमांचा समावेश असलेल्या जनजागृती कार्यक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद व उमंग सेंटरच्या माध्यमातून हा उपक्रम घेण्यात आला.

जनजागृती कार्यक्रमास उमंगचे सचिव किरण उटगे, डॉ.श्रीशैलम तलारी, डॉ. वैभव उटगे, डॉ. प्रतिक केंद्रे, डॉ.आंचल बांते, डॉ.अर्जुन राठोड, गणेश डोंगरे, किरण कांबळे, डॉ. शिवानी पाटील, डॉ.प्रविण राठोड, डॉ.भक्ती गोजमगुंडे, डॉ.तेजस्विनी लकडे, डॉ. सनोबर तांबोळी, अर्पणा बेंबळगे, उमंगचे व्यवस्थापक श्रीहरी गोरे, रामेश्वर जाधव आणि उमंग टीम यांनी उपस्थिती लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here