प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर सामाजिक न्याय व विशेषसहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)पुणे, समतादूत प्रकल्प अंतर्गत भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाली या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा शाळा व महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या संविधानावर प्रश्न मंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
आज दिनांक 28/11/2024 ला हिंदी सिटी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्याल चंद्रपूर येथे कार्यक्रमा ची सुरवात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बार्टी च्या चंद्रपूर तालुका समन्वयक डॉ. माधुरी उराडे यांनी संविधानातील समता, स्वातंत्र,बंधुता तसेच महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना संविधानावर प्रश्न विचारण्यात आले विद्यार्थ्यांनी समर्पक उत्तरे देऊन उत्तम प्रतिसाद दिला. अध्यक्ष स्थानी जेष्ठ शिक्षक रवींद्र सोनकुसरे होते ते आपल्या भाषणात म्हणाले की अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधाना विषयीची जागृती होते व गुणवत्ता वाढते. असे उपक्रम राबविने ही काळाची गरज आहे.
कार्यक्रमा चे संचालन सगुणा कानकाटे नी केले व आभार प्रदर्शन सरोज वेटे यांनी केले.
कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षीकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

