prabodhini news logo
Home आरोग्य सिंदेवाही येथे भव्य विनामूल्य मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

सिंदेवाही येथे भव्य विनामूल्य मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

0
239

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर – रूग्णसेवा हिच खरी ईश्वरसेवा” हा ध्यास नेहमी अंगी बाळगणारे, ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय तथा कर्तव्यनिष्ठ आमदार आदरणीय विजय वडेट्टीवार माजी विरोधी पक्षनेते, विधानसभा महाराष्ट राज्य, यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त,सेवाग्राम मेडिकल कॉलेज सेवाग्राम, लायन्स क्लब चंद्रपूर, तथा तालुका कांग्रेस कमिटी, सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदेवाही येथे “भव्य विनामूल्य मोतिबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दि.१२-१२-२०२४ रोजी गुरुवारला मा.आ.विजय वडेट्टीवार जनसंपर्क कार्यालय सिंदेवाही येथे करण्यात आले आहे,तरी गरजू रूग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक रमाकांत लोधे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदेवाही तथा तालुकाध्यक्ष कॉग्रेस कमिटी सिंदेवाही आणि समस्त तालुका काँग्रेस कमिटी सिंदेवाही यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here