मुरूम घेऊन जाणारे टिप्पर महसूल कर्मचाऱ्यांनी केले जप्त

0
294

किनवट प्रतिनिधी- किनवटच्या तहसिलदार डाॅ.शारदा चौंडेकर यांनी गौणखनिजाची चोरी करणार्‍याविरुद्ध युद्धपातळीवर धरपकड मोहीम चालु केली आहे. आज (५ डिसेंबर) दुपारी त्यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी देविदास कांबळे, तलाठी भाग्यश्री तेलंगे यांच्यासह इत्तरांचा समावेश असलेल्या महसूल पथकाने राजगडहून किनवटला मुरुम घेऊन येणारे टिपर राजगड घाटात पकडून तहसिल कार्यालयात लावले. पर्यावरणाला बाधा पोहोचवणार्‍या यंत्रणेविरुद्ध किनवटच्या पत्रकारांनी आक्रमक पावित्रा घेतला असल्यामुळे प्रशासनाचीसुद्धा नाचक्की झाली. सहायक जिल्हाधिकारी मेघना कावलींनी माहूरच्या तहसिलदारांविरुद्ध घेतलेल्या पावित्र्याची किनवटमध्ये पुनरावृत्ती करणार काय याकडे पत्रकारांचे लक्ष लागून आहे.
५ डिसेंबर रोजी तहसिलदार डाॅ.शारदा चौंडेकर यांच्या आदेशावरुन मंडळ अधिकारी देविदास कांबळे आणि तलाठी भाग्यश्री तेलंगे यांनी राजगड घाटात अवैध मुरुम घेऊन जाणारे एम.एच.०४-जी.आर.३८६६ क्रमांकिचे टिपर पकडले. तलाठी अनुपमा पेंदोर, सुशिल जाधव, आदिनाथ डुकरे आणि हरीश यादव यांच्या पथकाने राजगडहून किनवटकडे चोरट्या मार्गाने भरदिवसा बिनधास्तपणे मुरुमाची वाहतूक करणारे टिपर पकडले असून वृत्त पाठवेपर्यंत पंचनामा प्रक्रीया चालू होती. रेती, दगड, मुरुमाचे वाहाने धरुन राॅयल्टी वसूल न करता संबंधितांविरुद्ध पोलीसात मातमत्ता चोरीचे गुन्हे दाखल करुन वाहाने सोडून न देता कायम जप्त केल्याशिवाय ही अवैध धंदे थिंबतील असे वाटत नसल्याच्या लोकप्रतिक्रीया बोलक्या झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here