
सहा डिसेंबर 56 साली
ही काळोखी रात्र होती
आमच्या डोईवरचे छत हे
कोसळले हे ध्यासातच नव्हते
पोरके झालो बाबा तुजविण
आहे तुमच्या परतण्याची आस
पण नाही असे होत काही
तुमच्या येण्याचेही सरले भास
काळरात्र ती करून गेली
माझ्या बाबांना निवांत जगातून
सागराच्या लाटेने नतमस्तक केले
भिमरायाच्या पाऊलाना वंदन
विचारच राहिले आता
दिलेला वारसा माझ्या भिमरायाचा
चीरणीद्रेणी झोपी गेले मानवा
खंत नको करू घे विचारसरणी त्यांचा
कोटी वंदन करूनिया आजही
नाही देत कोणी माझ्या बाबांना
कुठे शोधू तुजला बाबा माझ्या
अश्रूंनी देते ही मानवंदना
कवयित्री रंजना भैसारे
नागपूर














