
प्रशांत देशपांडे जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज, यवतमाळ-आपल्या कृतीद्वारे लोकसेवेला वाहून घेणा-या समाजसेवक व अखिल भारतीय महिला संवैधानिक परिषदेच्या राज्याध्यक्ष मा. मनिषाताई तिरणकर यांना दि.०१ नोव्हेंबर २०२४ ते ०१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रुग्णांच्या न्याय व हक्काचे कायम संरक्षण करणारी रूग्ण हक्क संरक्षण समिती या रूग्ण हितार्थ, रूग्ण सेवार्थ कार्य करणाऱ्या समितीच्या विदर्भ विभाग महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.तसेच नॅशनल चाईल्ड अँड वूमन डेव्हलपमेंट कौन्सिल न्यू दिल्ली वाईस प्रेसिडेंट महाराष्ट्र नॅशनल अँटीकरप्शन अंड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडिया जिल्हा अध्यक्ष यवतमाळ भारतीय नारी रक्षा संघटना सदस्य यवतमाळ अश्या संघटनेत त्या काम करत
सातत्याने महिलांवरील होणारे अत्याचार, अन्याय, भेदभाव,शोषण या विरुद्ध तसेच आदिवासी,दलित, शोषित, कष्टकरी, कामगार, सर्वहारा समाजाच्या व बालक हितासाठी संघर्ष करीत असतात. रूग्ण व त्यांची रूग्णालय कडून होणारी हेळसांड, गैरसोय, दुर्लक्षितपणा,त्याचे नाकारलेल्या जाणारे हक्क मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने लढत आलेल्या आहेत, सेवाभावी कृतीला लक्षात घेऊन आजपर्यंत अनेक संस्थांनी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
आता पुन्हा त्यांना रुग्ण हक्क संरक्षण समितीने संस्थाप अध्यक्ष adv निलेश करमुडी , हनुमंत गोत्राळ , प्रदेशाध्यक्ष, शिवाजी चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष यांनी नियुक्तीपत्र देवून निवड केली आहे. या साठी त्यांनी अ.भा.महिला संवैधानिक हक्क परिषद, चळवळीतील सर्व सहकारी यांचे श्रेय मानले आहेत.














