“महाराष्ट्राचे उत्कृष्ट कवी” ठरले आहेत मा. कवी. बबन नाथू चव्हाण, चऱ्होली जिल्हा पुणे, तर “महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री” ठरल्या मा. कवयित्री- संगिता उमाकांत घोडेस्वार, तुकुम, चंद्रपूर
सोलापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय समूहात प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या महत्वपूर्ण विषयांवर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कवी आणि कवयित्री मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
“सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय मंच” यांचे तर्फे आठवडी काव्यलेखन स्पर्धा क्र. १० ही दि. २ डिसेंबर ते ६ डिसेंबर २०२४ या दरम्यान घेण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महा मानवाला अभिवादन करण्यासाठी “भारताचा कोहिनूर हरपला” या विषयावर काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत एकाहून एक ह्रदयस्पर्शी रचना आल्या होत्या. सर्व कवींनी अतिशय सुंदर कविता लिहिल्या होत्या.
या काव्यलेखन स्पर्धेत यावेळी
“महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी” बबन नाथू चव्हाण, पुणे यांना मिळाला आहे. कवींचे अनेक समूहात सातत्यपूर्ण लेखन सुरू आहे. अनेक समूहाची सन्मानपत्र त्यांना प्राप्त असून अनेक आँनलाईन पुरस्कार देखील मिळाले आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री चा सन्मान कवयित्री मा.संगिता उमाकांत घोडेस्वार,चंद्रपूर यांना मिळाला आहे. कवयित्री एम. ए. एम. एड असून पीएचडी सुरू आहे. त्या राजुरा येथे शिक्षिका असून त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला आहे. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. तसेच लोकमत तर्फे त्यांना उत्तम शिक्षिका पारितोषिक मिळाले आहे.
दोन्ही कवींचे समूहाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व भविष्यकालीन वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सम्यक दर्शन साहित्य समूहाचे संस्थापक देविदास गायकवाड तसेच सौ.सुनिता तागवान हे आहेत तसेच सुजाता उके ह्या प्रशासिका आहेत.
या समूहात प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक आठवड्यात एक कवी व एक कवयित्री यांना हा सन्मान दिला जातो. तेव्हा पुढील स्पर्धांमध्ये साहित्यिकांनी सातत्याने सहभागी होत रहावे असे आवाहन समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

