prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूर येथील सिकाई मार्शल आर्ट असोसिएशनच्या चिमुकल्यांनी पदके पटकाविले

चंद्रपूर येथील सिकाई मार्शल आर्ट असोसिएशनच्या चिमुकल्यांनी पदके पटकाविले

0
309

भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – महासंघ(S.G.F.I) हरियाणा राज्य क्रीडा परिषद , क्रीडा व युवक प्राधिकरण, क्रीडा सिकाई असोसिएशन ऑफ हरियाणा व सिकई फेडरेशन ऑफ इंडिया मान्यताप्राप्त दिनांक ७,८ आणि ९ डिसेंबर २०२४ ताऊ देवीलाल क्रीडा संकुल, (ऑलम्पिक भवन हरियाणा), पंचकुला चंडीगढ , हरियाणा येथे २५ वी कॅडेट, नॅशनल सबज्युनिअर अँड ज्युनिअर सिकाई मार्शल आर्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत अनेक राज्यातून (१५ राज्य) ५०० ते १००० खेळाडूंचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्ण ,रौप्य आणि कांस्य पदके प्राप्त करीत महाराष्ट्राचे व चंद्रपूर जिल्ह्याचे तसेच शाळेचे नाव शिखरावर पोहचवीले आहेत.
विद्यार्थ्यांचे पुढील प्रमाणे नावे व खेळ प्रकार :-
एरो सिकाई मिक्स ग्रूप, एरो सिकाई ग्रूप आणि लोबा.

वयोगट :- ११ आणि १४ वर्षे मुले/ मुली

तन्मय महादेव राजुरकर – २ सुवर्ण पदके

देवेन श्याम इंगळे- सुवर्ण आणि कांस्य पदक

नुहाफातिमा – सुवर्ण आणि कांस्य पदक

सार्थक राजेश पोलावार-रौप्य पदक

आहील रफी मोहम्मद-रौप्य पदक

तक्ष संकेत मून -रौप्य पदक

अथर्व सुजित कडसकर- रौप्य पदक

एलीन राकेश सुनार – कांस्य पदक

निधी गणेश कृष्णपल्लीवार- कांस्य पदक

परी रवींद्र तलहार – कांस्य पदक

अलाशका जाहीद हुसेन- सहभाग

उत्कर्ष नरेंद्र डवरे- सहभाग
संस्थेचे अध्यक्ष मान.श तारेंद्र पुरुषोत्तम शेजपाल सचिव संतोष रतन कडपेवाले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व कोचेस व पालकगण यांनी देखील विद्यार्थ्यांच्या यशाकरिता शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here