जिल्हाधिकारी अकोला मार्फत यांच्या मा.मुख्यमंत्रीना निवेदन
अकोला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – परभणी जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन रोडवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील भारतीय संविधानाची प्रतिकृती सोपान दादाराव पवार या मनुवादी विचारसरणीच्या व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आले.
या व्यक्तीवर तात्काळ कोणी दाखल करून त्याला देशद्रोही म्हणून घोषित करावे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे माथेफिरू म्हणून वाचवण्याचं प्रयत्न प्रशासनाने करू नये त्याला कोण हे विटंबना करण्यासाठी सांगितले त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि महाराष्ट्र हा दंगे होण्यापासून वाचवण्याचा काम करावं महाराष्ट्रात दोन समाजात मोठी दंगल व्हावे या उद्देशाने हे घटना घडून आणली या घटनेचा मास्टरमाईंड कोण आहे त्याची सकल चौकशी झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रभर भीमसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो. ज्याला देशाचा संविधान मान्य नाही त्याला या देशात राहण्याचा अधिकार नाही. तात्काळ देशद्रोही म्हणून या देशातून हकालपट्टी केली पाहिजे.
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश शिरसाट, नक्षल तेलगोटे, रोशन शिरसाट, एडवोकेट प्रदीप पवारगुरु, नील सोनवणे, सिद्धू मेश्राम, बिट्टू शिरसाठ, अनिकेत इंगळे, भरत इ. कार्यकर्ते उपस्थित होते..
अशी आम्ही मागणी करतो आणि या घटनेचा जाहीर तीव्र निषेध करतो.

