सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील राजीव गांधी इंजिनिरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्याच्या समस्या सोडविण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी-ओबीसी विभाग तर्फे जिल्हाध्यक्ष राहुल चौधरी यांच्या नेतृत्वात,ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र बोबडे यांचे प्रमुख उपस्थितीत शिस्टमंडळानी इंजिनिरिंग कॉलेज चे प्राचार्य अनिल चिताडे यांना समस्यांचे निवेदन सादर करून विद्यार्थ्यांच्या समस्या चार दिवसात सोडवा अन्यथा कॉलेज समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.शिस्टमंडळात ओबीसी विभागाचे जागिर भाई,गुड्डू शेडमाके, प्रभू शेट्टी यांचे सह समस्याग्रस्त विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

