आजची कविता – गीता जयंती

0
50

मोक्षदा एकादशीस
अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती
सांगितली गीता श्रीकृष्णाने
म्हणून म्हणतात गीता जयंती

गीतेचा हा ग्रंथ
एकमेव आहे
ज्याची जयंती
साजरी केली जाते

केला उपदेश
कृष्णाने, अर्जुनास
कर्म,धर्म ,विषयी
कसे लढावे गुरुंशी

तीच होती भगवद्गीता
भगवंतांनी गायलेली
अठरा अध्याय असलेली
नंतर व्यासांनी लिहिलेली

गीता जयंतीच्या दिवशी
करावे पूजन गीतेचे
वाचन, चिंतन, मनन करावे
आपल्या राष्ट्रीय ग्रंथाचे

कवयित्री रेखा डायस
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here