सुभाष दरेकर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर 9858322466- श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे आज म्युझिक नाईट हा संगिताचा सदाबहार कार्यक्रम जानवी संदीप दरेकर व विर संदीप दरेकर या दोन बालकलाकारांनी सादर केला निमित्त होते जानवी हिचा वाढदिवस या कार्यक्रमात हिंदी मराठी चित्रपटातील गाणे लावण्या सादर केल्या अत्यंत सुंदर अशा आवाजात विर यांनी गाणी व लावण्या गायल्या तसेच जानवी हिने सुंदर पद्धतीने गिटार व इतर वाद्य वाजवून प्रेक्षकांची मने जिंकली विर या बालसंगितकरांनी आपल्या सुंदर अशा आवाजाने गायलेल्या गाण्यांनी आलेल्या प्रेक्षकांना सुद्धा नाचण्याचा मोह आवरता आला नाही दोन तास हा कार्यक्रम सुंदर पद्धतीने वाद्य वाजवून स्वतः च्या आवाजात गाणे लावण्या सादर केल्यामुळे अनेक प्रेक्षकांनी बक्षीस सुद्धा देऊन कौतुक केले
या कार्यक्रमाचे उद्घाटन गौरी शुगर कारखान्याचे व्यवस्थापक यादव साहेब ज्ञानदेव दरेकर साहेब व सुनील दरेकर सर यांच्या हस्ते करण्यात आला सुत्रसंचलन रवींद्र पंडित यांनी केले यावेळी हिरडगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सोसायटी चे चेअरमन व्हा चेअरमन सर्व सदस्य संचालक तसेच गौरी शुगर कारखान्याचे मॅनेजर यादव साहेब काष्टी सोसायटी माजी मॅनेजर बाळासाहेब दरेकर भाजपचे नेते मिलिंद दरेकर युवा नेते संतोष दरेकर खरेदी विक्री संघाचे संचालक भरत भुजबळ तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व गावातील संगित प्रेमी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथम प्रबोधिनी न्युज तर्फे जानवी या बालकलाकाराला जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

