जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी – वरखेडा-मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालय व अभिनव बालविकास मंदीर वरखेडा विदयालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर मविप्र समाज संस्थेचे दिंडोरी तालुक्याचे संचालक प्रविण नाना जाधव, सुनिल हरिभाऊ भुसाळ (पी.एस.आय (P.S.I), रमेश वडजे सर (सेवानिवृत्त उपक्रमशील मुख्याध्यापक), वसंत उफाडे (महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय योगासन स्पर्ध्येत राज्यात सहावे, नाशिक जिल्ह्यात पहिला क्रमांक), शालेय समिती अध्यक्ष प्रकाश नाना भुसाळ,वरखेडा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दशरथ उफाडे,माजी चेअरमन दत्तात्रय उफाडे,विजय भुसाळ,अशोक सवंद्रे,सिताराम सवंद्रे, सुभाष वडजे, विजय देशमुख,म.वि.प्र. सोसायटीचे संचालक कृष्णराव बाबा मोरे,कांता देव, जगदीश वडजे
विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील वरिष्ठ लिपिक कैलास उगले सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत आणि प्रतिमापूजनाने करण्यात आली.शाळेच्या प्रवेशापासून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या लेझिम पथकाने वाजतागाजत केले.उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते थोर शास्त्रज्ञ,डॉ सी.व्ही. रमण,डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी,”विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक व चिकित्सक दृष्टी निर्माण व्हावी यासाठी शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.विद्यालयातील श्रेया भुसाळ या विद्यार्थिनीने विज्ञान प्रदर्शन आम्हा विद्यार्थ्यांसाठी नवी प्रेरणा असते.असे सांगितले.विद्यालयाच्या जेष्ठ विज्ञान शिक्षिका सरिता कांगणे यांनी विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी नवी पर्वणी असते.यातून भावी शास्रज्ञ तयार होतात.त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो.त्यांनी कमी कालावधीत केलेल्या प्रतिकृती नक्कीच कौतुकास्पद आहे.म.वि.प्र.सांस्कृतिक महोत्सवात तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यालयाची श्रेया पडोळ हिने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच समूह गीत स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम पारीतोषिक मिळविलेल्या विद्याथ्यांर्थ्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यालयातील उपस्थितांना विज्ञान शिक्षिका वृषाली रौंदळ यांनी पर्यावरण शपथ दिली.शालेय समितीचे सदस्य डॉ.साहेबराव भुसाळ यांनी आपल्या मनोगतात वरखेडा विद्यालय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी सदर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून ते अतिशय स्तुत्य आहे.असे सांगितले.योगगुरू वसंत उफाडे यांनी, “शालेय स्तरापासून विज्ञान प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिंडोरी तालुका संचालक आदरणीय प्रविण नाना जाधव म्हणाले की,वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी शालेय विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी समजावून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहकार्याने दरवर्षी आयोजित केले जाणारे विज्ञान प्रदर्शन अत्यंत उपयुक्त आहे.विज्ञान,संशोधन आज काळाची गरज बनली आहे.तंत्रज्ञान म्हणजे उपयोजित विज्ञानच होय.विज्ञान विषयक जागृती शालेय स्तरापासून व्हावी व मुलांना विज्ञान विषयाची गोडी व आवड निर्माण होण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जात असते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगाचे त्यांनी कौतुक केले व भविष्यात असेच संशोधक निश्चितच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतून निर्माण होतील असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय मनोगतात न्यू इंग्लिश स्कुल दिंडोरी हायस्कुलचे उपक्रमशील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. रमेश वडजे सर म्हणाले की,”शालेय स्तरावर आयोजित विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी असे प्रदर्शन सद्यस्थितीत काळाची गरज बनलेली आहे.विद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनात अभिनव मंदीर मधील 35 प्रतिकृती,लहान गटात 5 वी ते 7 वी विद्यार्थ्यांनी 44 प्रतिकृती व मोठ्या गटात इयत्ता 8 वी ते 10 वी विद्यार्थ्यांनी 44 प्रतिकृती तयार करून ठेवण्यात आल्या होत्या. एकूण 123 प्रतिकृती होत्या. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने यात सहभाग घेतला व आपल्या प्रतिकृतींची सखोल माहिती देखील मान्यवरांना सांगितली.याप्रसंगी अनेक वैज्ञानिक रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या.कार्यक्रमाप्रसंगी सुंदर असे फलक लेखन विद्यालयातील कलाशिक्षिका सुवर्णा भोर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 9 वी च्या विद्यार्थिनी श्रेया पडोळ,सृष्टी उफाडे यांनी संयुक्तपणे केले तर आभार जेष्ठ शिक्षक शाम बोराडे सरांनी मानले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

