prabodhini news logo
Home अहेरी अहेरी शहरातील मुख्य मार्गावर रहदारीस अडथळा

अहेरी शहरातील मुख्य मार्गावर रहदारीस अडथळा

0
88

नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

विवेक मिरालवार तालुका प्रतिनिधी अहेरी – अहेरी : शहरातील मुख्य मार्गावर अनेक वाहनधारक आपली वाहने अस्ताव्यस्त पद्धतीने उभी करत असल्याने मुख्य मार्गावर वाहतुकीस अडथळा होऊन वाहतुक कोंडी होत असते. याकडे मात्र नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

अहेरी शहरातील एकमेव मुख्य मार्ग म्हणून बस स्थानक पासून ते दक्षिण मुखी हनुमान मंदिर पर्यंत परिचित आहे. याच मुख्य मार्गावरून महामंडळचे बसेस, स्कूल बसेस, ट्रान्सपोर्ट ट्रॅक, माल वाहतूक ट्रॅक, टॅक्सी, पिकप तसेच दुचाकी वाहने व सायकल देखील याच मार्गाने रहदारी करत आहेत. मात्र याच मार्गावर किराणा दुकान, कपड्याचे दुकान, हॉटेलस, मेडिकल, फळ विक्रेते, चायनीज आदी दुकाने आहेत. त्यामुळे दुकानात जाणारे ग्राहक आपले दुचाकी वाहने मार्गावरील मद्यभागी ठेवत असल्यामुळे शाळकरी तसेच अन्य नागरिकांना रहदारीस मोठी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना व नागरिकांना रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मार्गावर दुचाकी वाहने ठेवणाऱ्या नागरिकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी म्हणून नगराध्यक्षा रोजा करपेत यांना उन येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक सूनतकर यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here