आलापली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग वर धूळ च धूळ

0
116

विवेक मिरालवार तालुका प्रतिनिधी अहेरी – आलापली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (३५३ सी) आलापली पासून १५ किमी अंतरावर नंदीगाव ते गुड्डीगुडम या गावाच्या मधात महामार्ग एक वर्षांपूर्वी खोदून फक्त गिट्टी पसरविण्यात आले. ती गिट्टी वर्दळ वाहनांमुळे उखळून पूर्णतः पसरली आहे.

त्या ठिकाणी दुचाकी वाहन धारकांना एक किमी रस्ता आपलं जीव मुठीत घेऊन पार करावा लागतो तसेच मोठी वाहन आली तर धुळीत रस्ताच दिसत नाही इतका धुळ उडत आहे.

त्या ठिकाणी अनेकदा अनेक दुचाकीवाहन धारक दुचाकी स्लिप होऊन कोसळून जखमी झाले आहेत. वेळेप्रसंगी भविष्यात सदर ठिकाणी मोठा अपघात घडल्यास संबंधित कंत्राटदार जबाबदार राहील काय? असे नागरिकांकडून प्रश्न निर्माण होत आहे.

नंदिगाव ते गुड्डीगुडम जवळील मार्गचं काम सुरू न करताच संबंधित कंत्राटदार मार्ग खोदून गिट्टी पसरविल्यामुळे वाहन धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. करिता या ठिकाणी मार्ग त्वरित बनवावे किंवा गिट्टी बाजूला करावे जेणेकरून राहादरीस अडचण निर्माण होणार नाही.

गेल्या वर्षी या ठिकाणी संबंधित कंत्राटदार चांगल्या मार्गाला खोदून त्या ठिकाणी गिट्टी पसरवले आणि या ठिकाणी वर्षांभरापासून सदर कंत्राटदार लक्ष देत नसून या ठिकाणी दुचाकी धारकांना खुप अडचण सहन करीत धुळीतून मार्ग काढावा लागत आहे तसेच काही दुचाकीस्वार कोसळून जखमी झाले या ठिकाणी मोठी वाहन गेल्यास धूळ असे उठतो की जसे धूळ व्हे का, सकाळ चे धुके व्हे हे समजायला कठीण जात आहे. भविष्यात या ठिकाणी अपघात घडून अनुचित प्रकार घडल्यास सर्व कंत्राटदार जबाबदार राहणार काय? या ठिकाणी मार्ग लवकरात लवकर बनवावे. हरीश गावडे, नंदीगाव, उपसरपंच ग्रा.प., देवलमरी

नंदीगाव ते गुड्डीगुडम मधातील एक किमी मार्ग खोदून गिट्टी पसरवले आहेत सदर गिट्टी उकडून सैरावैरा असल्याने दुचाकी व सायकल धारकांना अनेक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी कोसळल्याचे अनेक घटने घडले आहेत या ठिकाणचे गिट्टी बाजूला करावे किंवा मार्ग त्वरित बनवावे व धूळ कमी करण्यास मार्ग बनवेपर्यंत संबंधित कंपनी दररोज पाणी मारावे.- महेश मडावी, गुड्डीगुडम, माजी सरपंच, ग्रा.प. तिमरम

या मार्गावर रात्र-दिवस मोठया वाहनांची वर्दळ असते. सदर ठिकाणी गिट्टी उकळल्यामुळे या ठिकाणी दुचाकीस्वार आपलं जीव मुठीत घेऊन धुळीत आपली दुचाकी काढावं लागत आहे. परिणामी त्रासाला समोर जावा लागत आहे. या ठिकाणी अनेक दुचाकीस्वार कोसळले हे माझ्या उपस्थितीत झालं आहे. हे ठिकाण अपघातास आमंत्रण दिल्यासारखे आहे. म्हणून या ठिकाणी मार्ग त्वरित बनवावे अन्यथा गिट्टी बाजूला करावे- अनिल पेंदाम,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here