
प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – संविधानीक पदावर असलेल्या देशाचे गृह मंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉ बाबासाहेब आंबेकर यांच्या संदर्भात अपमानजनक वक्तव्य केल्यामूळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत गृहमंत्री पदाचा राजीनामा पंतप्रधान मोदींनी घ्यावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिनेे येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर चंद्रपूर येथे *तिव्र निदर्शने आंदोलन* करण्यात आले.
कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणा व ना-यामूळे परिसर दणाणून गेला होता.
गृहमंत्री शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भाने फॅशन म्हणून आंबेेडकर आंबेडकर असे नाव घेण्यापेक्षा देवाचे नांव घेतले असते तर सात जन्म स्वर्गात जागा मिळाली असती, असे मनुवादी वक्तव्य केल्याने तामाम जगभरातील व देशातील डॉ आंबेडकरांना मानणा-या अनुयायांच्या भावना दु:खावल्यामूळे तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
देशाचे गृहमंत्री शहा हे जोपर्यंत आपल्या संविधानीक पदाचे राजीनामा देत नाही तोपर्यंत देशभरात तिव्र आंदोलने सूरूच राहणार आहेत. अशा बेजबाबदार गृह मंत्र्याला संविधानीक पदावर राहण्याचा अधिकार नाही. म्हणून प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य कुशल मेश्राम यांनी केले. या आंदोलनाला चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष सोमाजी गोंडाने, पूर्व विभागाचे कार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे, महिला आघाडीच्या अध्यक्ष कविताताई गौरकार, महानगर अध्यक्ष बंडू ठेंगरे, महानगर अध्यक्ष महिला तनुजा रायपुरे, सतीश खोब्रागडे, सुभाष थोरात, सुनील खोब्रागडे, दिव्यकुमार बोरकर, किशोर रायपुरे, संतोष अलोणे,छोटू दहेकर, सिद्धांत पुणेकर,मधुभाऊ चुनारकर, उमेश कडू, अभिलाष चुनारकर, विजय जुलमे, अल्काताई मोटघरे,स्नेहल रामटेके, ललिता गेडाम, प्रज्ञाशील सहारे, अशोक पेरकावार, कमलेश मेश्राम, राजू कीर्तक,संदीप देव,सोनल वाळके,कृष्णाक पेरकावार, मोनाली पाटील, इंदुताई डोंगरे, विश्रांती डांगे, शोभा वाघमारे, किरण कुमरवार, विद्या टेम्भरे, लता साव, मृणाली नगराळे, उषा नगराळे, प्रज्ञा रामटेके, दर्शना निमगडे, पूजा लांडगे, रजनी पाझारे, विभा पाटील, मंगला मेश्राम, ताई गावंडे, प्रतिभा रामटेके, पुष्पलता कोटांगळे,लक्ष्मी खोब्रागडे,अश्विनी तेलसे, सपना रामटेके, वंदना पुणेकर, सुशीला जगताप, शालिनी जयकर, मायाबाई जीवणे, सुनीता पुडके, निशा कांबळे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते…














