प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – काजवा

0
132

रात्रीचा अंधार दाटता
क्षणभर झळकतो प्रकाश
काजवा दाखवत मार्ग
संधीत उभा आसमंत खास…

झाडांवरती उडता उडता
तुला शोधते सारी दिशा
प्रकाशाचा तू जिवंत चंद्र
चमकतोस मनातही अशा…

अंधाऱ्या वाटेची ज्योत
तुझ्या तेजाने फुलली
काजव्याला पाहून
सर्व रात्र सुंदर सजली…

उडत जाई उंच झाडांवर
क्षितिजावर लावत दिवा
काजव्याची ही रोषणाई
आशेचा तो अनमोल ठेवा…

झाडा फांद्यांच्या खेळात
चमकतोस तू क्षणोक्षणी
अंधाऱ्या रात्रीचा राजा
काजव्याची दुनिया मोहिनी…

दिवसा लपून बसतो
रात्र होता तुझी सवारी
काजवा शिकवतो तत्त्व
आत्मज्योतीचीच तयारी..

प्रकाशाच्या शोधात
तुझ्याकडे नजर फिरते
तुझ्या लुकलुकत्या ज्योतीने
रात्रही सुरेख दिसते…

कवयित्री संध्या रायठक / धुतडे
शिक्षिका, नांदेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here