prabodhini news logo
Home जळगांव भडगाव येथे भारत मुक्ती मोर्चाचे एक दिवसीय धरणे आंदोलन.

भडगाव येथे भारत मुक्ती मोर्चाचे एक दिवसीय धरणे आंदोलन.

0
105

जळगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भडगाव येथे तहसील कार्यालय जवळ भारत मुक्ती मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी, यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले, सध्याचे देशभरातील वातावरण अतिशय विषम व गढूळ झाले असून भारतातील मूळ निवासी बहुजन वर्गावर वाढत चाललेला अन्याय अत्याचार अतिशय चिंता आणि गंभीर आहे. नुकतेच १० डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथे संविधानाची प्रतिकृती मोडतोड करण्यात आली व या विरोधात शांततेने व लोकशाही मार्गाने आंदोलन करत असलेल्या तरुणांपैकी सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीत बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी  संसदेमध्ये गरळ ओकली याबाबत गृहमंत्री पदाचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर महाभियोग कारवाई नियमित करावी. इलाहाबाद हायकोर्टचे जज शेखर यादव यांनी मुस्लिम अल्पसंख्यांक लोकांविरुद्ध अपशब्द वापरत देशातील एकात्मतेला तडा देण्याचा प्रयत्न केला व संपूर्ण भारत देशाचे न्यायालयावर एक प्रश्नचिन्ह उभे केले त्यांना या पदावरून हटवून कायदेशीर कारवाई करावी.

८ ऑक्टोंबर २०१३ रोजी सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम मशीन मुळे फेयर आणि फ्री पारदर्शी निवडणूक होऊ शकत नाही असा निकाल दिलेला असताना आधुनिक मनुस्मृति असलेला EVM मशीन बंद करून बॅलेट पेपरवर  निवडणुका घेण्यात यावेत. यासाठी भारत मुक्ती मोर्चा तर्फे हाजी जाकीर कुरेशी  जळगाव जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भडगाव तहसील कार्यालय आवारात जोरदार एकदिवसीय धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे विनोद अडकमोल, एकलव्य संघटनेचे दयानंद बोरसे, भिम आर्मीचे अनिल भालेराव, लहुजी क्रांती मोर्चा चे रवींद्र थोरात आदिवासी एकता परिषदचे चुडामन सोनवणे भटके विमुक्त मोर्चाचे शंकर भराडी, विनोद पगारे,देविदास राठोड,प्रकाश बाविस्कर प्रल्हाद बाविस्कर, अनिल पाटील, शरद पाटील,तुकाराम गोसावी, गौतम शिरसाट, भगवान शिंदे, अशोक सोळशे, शेख जावेद शेख अख्तर, हरिदास राठोड, साबीर कुरेशी, रमजान खान, बेबाताई बोरसे, नितेश शेजवळ, रमेश गोसावी,सुभाष
बोरसे, प्रकाश मालचे, भूषण सोनवणे, मनोज बोरसे, यांच्यासह भारत मुक्ती मोर्चाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मागण्यांचे निषेध पर निवेदन मा. तहसीलदार साहेब व पोलीस प्रशासनाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here