prabodhini news logo
Home मराठवाडा ‘महाबीज’ चे व्यवस्थापकीय संचालक शेतकऱ्यांच्या बांधावर

‘महाबीज’ चे व्यवस्थापकीय संचालक शेतकऱ्यांच्या बांधावर

0
136

लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. 27 : महाबीजचे व्यवस्थापक योगेश कुंभेजकर यांनी चाकूर तालुक्यातील घरणी येथील बाळासाहेब गोपाळराव शिंदे यांच्या हरभरा नवीन वाण बीजी 20211 पुसा मानव बिजोत्पादन प्रक्षेत्राची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधतांना महाबीजकडून घेण्यात येणारे बिजोत्पादन व त्यातून शेतकऱ्यास होणारे फायदे, महाबीज उत्पादीत जैविक, ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाचा वापर करुन पिकातील मररोग नियंत्रण याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले.

विविध पिक पध्दतीत, पिकात हवामानानुसार होणारे बदल आणि पिकांच्या वाणांचे गुणधर्म ओळखून शेतकऱ्यांनी पिकाची लागवड कशी करावी, या विषयी कुंभेजकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादीत अकोला येथील महाबीजचे व्यवस्थापक (विपनन) प्रकाश ताटर , महाव्यस्थापक (प्रक्रिया व अभियांत्रिकी) प्रशांत पागृत, परभणी येथील विभागीय व्यवस्थापक डी.डी. कान्हेड , लातूर येथील जिल्हा व्यवस्थापक एन.जी. इनामदार, कृषी क्षेत्र अधिकारी एस.एन.ईरलोड व श्रीमती पी. एस. काशिद तसेच घरणी, घारोळा येथील शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here