
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चांदा शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित जनता महाविद्यालय चंद्रपूर द्वारे संस्थेचे सचिव डॉ. अशोकभाऊ जीवतोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम .सुभाष यांच्या हस्ते चंद्रपुर जिल्ह्यामधून पहिली राष्ट्रीय जलतरणपटू कु. प्रज्ञा श्रीकांत करडभाजने हीचा सत्कार करण्यात आला.
क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धा दिनांक ०५ ते ०८ नोव्हेंबर २०२४ रोजी पुणे येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये १४ वर्षाच्या आतील मुलींच्या जलतरण स्पर्धेत १०० मिटर बटरफ्लाय क्रिडा प्रकारात व्दितीय क्रमांक रजत पदत प्राप्त करीत राजकोट गुजरात येथे दि. २४ ते ३० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत कु. प्रज्ञा श्रीकांत करडभाजने हिने १०० मीटर बटरफ्लाय या क्रिडाप्रकारात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच चंद्रपूर जिल्हयातील पहिली राष्ट्रीय शालेय जलतरणपटू बि.जे.एम. कॉरमेल अकॅडमी चंद्रपूर येथे शिक्षण घेत आहे.
या प्रसंगी पालक श्रीकांत करडभाजने व डॉ . सुलभा करडभाजने तसेच महाविद्यालयातील उपप्राचार्य कला शाखा डॉ. ए. के. महातळे, उपप्राचार्य वाणिज्य शाखा प्रा. व्ही.एस. बोढाले, उपप्राचार्य विज्ञान शाखा डॉ.के.सी. पाटील, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.एन .आर. बेग, डॉ. एफ .डब्लू. निरंजने, डॉ . दीपिका संतोषवार व प्राध्यापकवृंद उपस्थित होते.














