prabodhini news logo
Home उदगीर शेकापूर येथे पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन

शेकापूर येथे पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन

0
119

बळीराम लांडगे तालुका प्रतिनिधी,उदगीर – आज दि(28) रोजी शेकापूर ता.उदगीर येथे बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनी,लोहारा व कृषी विभाग,उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने शेकापूर येथे पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेला तालुका कृषी कार्यालय,आत्मा विभागाचे व्यवस्थापक नितीन दुरुगकर,संदिपान अंधारे,कृषी साहयक हाळीघोंगडे,कंपनीचे अध्यक्ष हंसराज मोमले,उपाध्यक्ष विजया सावंत,अफार्म संस्थेचे समुह संघटक यशवंत गायकवाड व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थिताना नितीन दुरुगकार व यशवंत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.यामध्ये विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज आहे,जमिनीची सुपिकता टिकवून ठेवणे,सेंद्रिय शेती करण्यासाठी कमी खर्च,सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक लागणारी कृषी निविष्ठा तयार करण्याची सोपी पद्धत आहे,स्वतः घरी तयार करता येते,कसदार व चविष्ट अन्न आपल्या कुंटूबाना व इतरांना देता येते यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी.
या विषयीची माहिती यशवंत गायकवाड यांनी उपस्थीत शेतकऱ्यांना दिली.यावेळी शेकापूर गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here