
भिशी लावल्याने डोक्यावर कर्जाचा डोंगर
सोलापूर प्रतींनिधी प्रबोधिनी न्युज : सोलापूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भिशी लावल्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आणि त्याबाबतचा राग मनात धरून बार्शी तालुक्यात पतीने पत्नीला चाकूने भोसकून दगडाने मारून तिची हत्या केली आहे. यासोबतच त्याने आपल्या धाकट्या मुलावर देखील चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
शुक्रवारी सकाळी ६:३० वाजता ही घटना घडली आहे. बार्शी हद्दीतील नागोबाचीवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. मनीषा अनंत साळुंखे (वय ४४, रा. जावळे प्लॉट एस लॉन्सच्या पाठीमागे) असे मृत महिलेचे नाव आहे. धाकटा मुलगा तेजस अनंत साळुंखे(वय 21 वर्ष) हा गंभीर जखमी झाला आहे. घटना घडताच दाम्पत्याचा थोरला मुलगा समर्थ अनंत साळुंखे यांनी मारेकरी वडीलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. बार्शी ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी अनंत साळुंखेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक महानगर तर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात संपन्न
भिशीचे पैसे फेडले नाही, लोकांनी लावला होता तगादा
पोलिसांत दाखल तक्रारीत म्हटले आहे की, २६ डिसेंबरला रात्री आईवडील घरी नसताना मोठ्या मुलाकडे शेजारचे लोक आमचे भिशीचे पैसे दे, आमचे पैसे दिले नाहीत तर आम्ही घरातील सामान घेऊन जाऊ, घराला कुलूप लावून अशी दमदाटी केली होती. त्याने वडील अनंत साळुंखे यांना फोन लावून झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईवडील घरी आले तेव्हा वडील आईला शिवीगाळ करत होते. भिशीमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर झाला आहे. वेळेवर भिशीचे पैसे न दिल्याने लोकांनी तगादा लावला आहे. याचा राग अनंत साळुंखे यांच्या मनात होता.
अल्लापल्ली येथे जन आक्रोश मोर्चा आयोजन मा अजय कांकडालवर यांची उपस्थिती.
पुण्याला जायचे असे सांगत शेतात नेऊन ठार केले
तक्रारीत पुढे म्हटले की, वडील मारतील या भीतीने आईने मावशी कौशल्या राऊत यांना घरी सोबतीसाठी बोलावले होते. २७ डिसेंबरला सकाळी आई मनीषा हिने भिशी लावल्यामुळेच कर्ज झाले, असे म्हणाली. हा राग मनात धरून आरोपीने पुण्याला जायचे म्हणून आई व भाऊ तेजस याला मोटरसायकलवर बसवून नागोबाचीवाडी हद्दीतील आमच्या शेतात नेले होते. तेथे त्यांनी आईच्या गळ्याला टॉवेलने आवळून उजव्या कानाच्या खाली मानेवर कानाच्या पाठीमागील डाव्या बाजूस जबड्यावर धारदार चाकूने भोसकून तोंडावर डोळ्यावर दगडाने मारले. यामध्ये आई जागीच ठार झाली. तसेच छोटा मुलगा तेजस यास गळ्यावर पोटावर डाव्या बाजूस धारदार चाकूने मारून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने सारी पंचक्रोशी हादरली आहे. तर याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे हे पुढील तपास करत आहेत.














