प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आदर्श शिक्षिका, उत्कृष्ठ लेखिका, कवयित्री तसेच प्रेरणा बहुउद्देशीय फाउंडेशन संस्थेचे अध्यक्षा सौ पल्लवी आल्हाट या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग अहिल्यानगर येथे २००२ पासून शिक्षिका म्हणून सेवेत आहेत.२०१८पासून जगताप वस्ती, श्रीरामपूर येथे त्या कार्यरत आहेत. सन २०१८ ते २०२४ या दरम्यान त्यांनी लोकसहभागातून शाळेचा कायापालट घडवून आणला आहे. सुरुवातीपासूनच विद्यार्थी हिताचे,विद्यार्थी केंद्रीत असे अनेक उपक्रम त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवले आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले आहे. शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहेत. शासनाची विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. हे सर्व कामकाजाची दखल घेत, अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई यांच्यातर्फे “न्यायप्रभात शिक्षक रत्न” राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२४, तसेच महाराष्ट्र ग्रामीण व युवक विकास मंडळ परभणी यांच्या वतीने, “पूज्य साने गुरुजी समाजभूषण राष्ट्रीय पुरस्कार “२०२४ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले आहेत. मातोश्री जिजाऊ परिवर्तन संस्था गोंदिया यांच्या वतीने “राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे.
दर्जेदार, समाज प्रबोधन पर साहित्य लेखन २०२४ साठी, मातोश्री जिजाऊ परिवर्तन संस्था गोंदिया यांच्यावतीने “साहित्य महर्षी पुरस्कार”, तेजस फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने, “राज्यस्तरीय साहित्यभूषण”व “राज्यस्तरीय काव्यभूषण”, हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रेरणा बहुउद्देशीय फाउंडेशन च्या माध्यमातून, प्राणीपक्षी,संवर्धन, दयाभाव या विषयी जागरूकता, तसेच समाज हिताची कामे त्या करत आहेत. शैक्षणिक, सामाजिक, व साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामाची दखल घेत, काव्य मित्र संस्था पुणे यांच्या वतीने “राष्ट्रीय महिला समाज भूषण पुरस्कार” जाहीर झाला आहे.
सौं. पल्लवी आल्हाट यांना शैक्षणिक, सामाजिक, आणि साहित्य, या तीनही क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. सर्व माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

