भीमा नदी साक्षीदार
लढाच्या इतिहासास
महारांनी शौर्याने रचला
विजयाचा महासंहास…
महार वीरांनी केला
अन्यायाचा प्रतिकार
भीमा कोरेगावचा
इतिहास साकार…
ती लढाई नव्हती
फक्त तलवारीशी
स्वाभिमानाची ज्योत
उंच होती उराशी…
महारांचा शौर्य लढा
अन्यायाच्या विरोधात
भीमा कोरेगावची गाथा
सत्याच्या आवाजत…
पेशव्यांच्या अन्यायाला
सडेतोड उत्तर दिलं
कोरेगावच्या भूमीत
शूरवीरांनी स्वातंत्र्य पेरलं…
१ जानेवारीच्या पहाटे
स्वाभिमान जगला
महार समाजाचा
शौर्यलढा यशस्वी झाला..
कवयित्री संध्या रायठक/ धुतडे
शिक्षिका, नांदेड

