संजीवनी फोरम व संजीवनी मत्स्य संघाच्या अनुषंगाने श्री प्रकाश बारहाते यांचे शेततळ्यातील मत्स्य खरेदी व विक्री शुभारंभ

0
117

कोपरगाव तालुका प्रतिनिधी: इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख 9860910063
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखान्याचे चेअरमन आणि युवा नेते मा.श्री. विवेकभैय्या कोल्हे साहेब यांच्या हस्ते आज गुरुवार दिनांक, ०२/०१/२०२५ रोजी, सकाळी नऊ वाजता, श्री. बापूसाहेब संपतराव बारहाते सो. संचालक सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखाना लि. यांचे वस्ती, संवत्सर धोत्रे रोड, कोपरगांव येथे पार पडला!
शेती सोबतच शेतकरी बांधवांनी जोडधंदा म्हणून मत्स्यपालन या व्यवसायाकडे संधी म्हणून बघण्याची आवश्यकता आहे. संजीवनी फोरम आणि संजीवनी मत्स्य संघाच्या वतीने नेहमीच शेतकरी बांधवांना या जोडधंद्यासाठी प्रेरित करण्यात येते आणि मार्गदर्शनासोबतच सहकार्य देखील केले जाते. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम कोपरगांव मध्ये होत असून यातून शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी मा.श्री. विवेक भैय्या कोल्हे यांनी, व्यक्त केली!
यावेळी उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here