तालुका प्रतिनिधी अहेरी विवेक बा मिरालवार 8830554583 – अहेरी : तालुक्यातीलआलापल्ली येथील पूनागुडम येथील दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोहर्रंम बंगला पूनागुडम ( आलापल्ली ) येथे कमिटीचा पदाधिकारी व सदस्य,गावकरी मिळून संदल-ए-शरीफ झेंडा कार्यक्रम उत्सहात साजरा केला आहे.कार्यक्रमचा पहिल्या दिवशी झेंडा कार्यक्रम आणि चादर गावात फिरवले जाते.
गावातला गस्त लावून आल्यावर देवाचं झेंडा उभा केला जातो.दुसऱ्या दिवशी संदल-ए-शरीफ नावांचा लंगर( अन्नदान) कार्यक्रम आयोजित केले जातो.या कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित दर्शवून कार्यक्रमला मार्गदर्शन केले.
संदल-ए-शरीफ झेंडा कार्यक्रमाचे आयोजन पत्रुजी आत्राम,रिंकू आत्राम,चिंटू आत्राम,जावेद पठाण,दिलीप सिडाम,बालाजी आत्राम,विनोद अर्का,महेश सल्लम,स्वप्नील सारकेवार,योगेश कोत्त्तावार,संदीप उरेत,मांतेश गड्डमवार,अमोल सडमेक,रोहित आर्का,गणेश आलाम,सीताराम कोरेत,अमोल कोरेत,अभय पोटे,आशिष तलांडे,दिग्विजय आत्रामसह कमिटीचे पदाधिकारी व सदस्य केले.
यावेळी उपस्थित प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,तसूभाई शेख,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.

