अखिल भारतीय क्रांती सेनेच्या युवक जिल्हाध्यक्ष पदी शब्बीर शेख यांची नियुक्ती

0
73

सुभाष दरेकर जिल्हा प्रतिनिधी अ. नगर – कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील शब्बीर बाबासाहेब शेख यांचीअखिल भारतीय क्रांतीसेनेच्या अहिल्यानगर युवक जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शेख यांना नियुक्तीचे पत्र पक्षाचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी दिले. या पुर्वी शेख यांनी युवक जिल्हा प्रमुख पदावर कार्य करताना उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात क्रांतीसेनेचे मोठे जाळे निर्माण केले. युवकांचे संघटन करत असताना सामाजिक बांधिलकी जपत शेतकर्यांचा वीज प्रश्न सोडविण्यासाठी महावितरण, कुकडी पाणी प्रश्नी, पशुधनाला लाळखुरकत सारखे लसीकरण होत नसताना आंदोलनाचा इशारा देत लसीकरण करण्याची मागणी केली अनेक वेळा अन्यायाविरुद्ध आवाज उठवला उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांची परत एकदा युवक जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली निवडीबद्दल क्रांतीसेनेच्या संस्थापिका माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील, पक्षप्रमुख संतोष तांबे, सरचिटणीस नितीन देशमुख, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, जिल्हा अध्यक्ष सुभाष दरेकर संदीप डेबरे, वैभव जाधव, , विक्रम ढवळे, विकास म्हस्के, शब्बीर शेख, गोकुळ नेटके, साजन शेख, दादा दंडे, भाऊसाहेब सुद्रिक, इंद्रजित शिंदे, पप्पू देशमुख, सागर दरेकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here