prabodhini news logo
Home ठळक बातम्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात गुंजनला प्रथम पारितोषिक

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात गुंजनला प्रथम पारितोषिक

0
121

भंडारा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत कला संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग – वस्त्र कला) मध्ये गुंजन याला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
गुंजन हा अड्याळ (जि. भंडारा) या गावातील असून, तो सध्या छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कला महाविद्यालय, किल्ले अर्क येथे बी.एफ.ए. (4था वर्ष) चा विद्यार्थी आहे.
आपल्या यशाचे श्रेय त्याने आपल्या गुरुजन प्रा.चिखले, प्रा.पाटील, आई-वडील, आत्या पुष्पा काटेखाये (कलाशीक्षिका) मावशी निरुपमा(कला शिक्षीका ) आणि कठोर परिश्रमांना दिले आहे. या यशामुळे गुंजनचे मूळ गाव अडयाल (जिल्हा भंडारा)आणि शाळा परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सर्वत्र गुंजन च्या यशामुळे शुभेच्छा चे वर्षांव होत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here