भारतीय जनता पार्टी आणि श्री. महाकाली मता महोत्सव समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य स्वागत
प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – मुख्यमंत्री झाल्या नंतर प्रथमच चंद्रपूर शहरात आलोय आणि या दौ-याची सुरवात माता महाकालीच्या दर्शनाने होणे हा शुभसंकेत आहे. काम करत असतांना शक्तीचा आर्शिवाद महत्वाचा आहे. मातेची ईच्छा असेल तर ठरविल्या पेक्षा मोठे काम इथे होणार, आपण पाठपूरावा करुन मंदिर परिसर विकासाचा कार्यक्रम पुर्ण करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मा. सां. कन्नमवार रौप्य महोत्सव कार्यक्रमा निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शुक्रवारी चंद्रपूर दौ-यावर होते. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने महाकाली मंदिर येथे मुख्यमंत्री यांच्या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री यांनी माता महाकालीची आरती केली. या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर अध्यक्ष राहुल पावडे, नेते खुशाल बोंडे, विजय राऊत, कल्याणी किशोर जोरगेवार, संध्याताई गुरनुले, महिला अध्यक्ष सविता कांबळे, संजय कंचर्लावार, रघुवीर अहिर, मनोज पाल, सुभाष कासनगोट्टूवार, युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर, डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री किरण बुटले, संदीप आवारी, विवेक बोडे, दशरथ ठाकूर, नामदेव डाहुले, अमोल शेंडे, राशीद हुसेन, नकुल वासमवार, विश्वजीत शहा, जितेश कुळमेथे, सलीम शेख, प्रकाश देवतळे, सुमित बेल, रामपाल सिंग, दत्तप्रसाद महादानी, महाकाली महोत्सव सामीचे सचिव अजय जयस्वाल, कोष्याध्यक्ष पवनजी सराफ, विश्वस्त मिलिंद गंपावर, प्रा. श्याम धोपटे, प्रा. शाम हेडाऊ, अशोक मते , संजय बुरघाटे, मनीषा पडगिलवार, डॉक्टर जयश्री कापसे गावंडे, वंदना हातगावकर, सायली तोंडरे, सविता दंडारे, आशा महाकाले आदिंची उपस्थिती होती. यावेळी महाकाली मंदिर परिसरात भव्य स्वागत मंच उभारण्यात आला होता.
येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमण होताच श्री महाकाली माता महोत्सव समिती आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, सामान्य मानसांचे जीवन सुखर होईल असे काम करण्याचा आशीर्वाद माता महाकालीला मागीतला आहे. महाराष्ट्र आणि सर्व समाज एकसंघ राहिला पाहिजे. समाजात काम करता असतांना शवेटचा माणूस डोळ्यासमोर राहिला पाहिजे. लाडक्या बहिणींचा आर्शिवाद आम्हाला मिळाला त्यातुन ऊर्जा मिळत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, 500 वर्ष जुने अस इथ महाकालीचे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकला जात असतांना त्यांनी माता महाकालीचे दर्शन घेतले असल्याचे ईतिहासात नमुद आहे. येथील परिसराराचा विकास करण्यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम आपण लवकर सुरु करण्याची मागणी त्यांनी यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. आमंत्रण स्वीकारून आपण आल्या बदलही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. आपल्या नेतृत्वात राज्यासह चंद्रपूर जिल्हाचा सर्वसमावेशक विकास होईल असा विश्वास यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. आपण चंद्रपूरचे भुमिपूत्र आहात त्यामुळे अधिक अपेक्षा या जिल्हाच्या आपल्याकडून असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी आणि श्री महाकाली माता सेवा समीतीच्या सदस्या आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शाल श्रिफळ, अम्मा टिफिन आणि सन्मानचिन्ह देत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले..

